
कवठेमहांकाळ येथील दोन दिवसांच्या तापलेले राजकीय वातावरणात अखेरकार शांत झाले. दोन गटातील वाद अखेर संपुष्टात आला. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या बैठकीत वाद मिटला. माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधातील तक्रार माजी उपनराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी माघार घेतली. पिपंळवाडी गावचे माजी सरपंच रमेश खोत यांनी मध्यस्थी करून दोन गटातील प्रमुखांना घेऊन वाद मिटवला.