
मिरज : मिरज तालुक्यातील एरंडोलीतील युवकाचा धारदार शस्त्राने निर्घुन खून करण्यात आलेची घटना घडली. आरग रस्त्यावर असणाऱ्या शाबू कारखान्याजवळील झुडपामध्ये त्याचा मृतदेह मिळून आला. खून झालेल्या युवकाचे नाव प्रमोद वसंत जाधव (वय ३२) असे असून त्याचा अनैतिक संबंधातून खून झाला असावा असा संशय पोलिसांकडून होत आहे.
जाधव हे जाधव वस्तीवर राहत होते. त्याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त होत आहे. प्रमोद हा मंगळवारी सायंकाळी आरग रस्त्यावर असणाऱ्या शाबू कारखान्याजवळ गेला होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने मानेवर आणि छातीवर हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी अद्याप नेमके कारण सांगितले नसले तरी हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चेची कुजबूज एरंडोली गावात होत आहे.