मिरज पूर्व भागातील खटाव येथे सुमारे २६ गणेशोत्सव मंडळाचे विसर्जन शांततामय वातावरणात व उत्साहात पार पडले.खटाव मधील काही मंडळाचे विसर्जन पाचव्या दिवशी,सातव्या दिवशी आणि नवव्या दिवशी करण्यात आले.
परंतू खटावमधील एकसंबे मळ्यातील श्री गणेश कला क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ यांच्या वतीने दररोज प्रवचन,भजन आणि शिवपाट कार्यक्रम ठेवून साध्या पद्धतीने विसर्जन अनंत चतुर्थीच्या दिवशी करण्यात आले.
मंडळाच्या वतीने दररोज पाच दिवस एक तास भजनीचा कार्यक्रम आणि एक तास प्रवचनाचा कार्यक्रम आणि अनप्रसाद ठेवण्यात आले होते.तसेच मंडळाच्या वतीने गावातील महिला गुरुमाऊली शिवपाठ भजनी मंडळाचा कार्यक्रम दोन दिवस ठेवण्यात आले होते.
तसेच गावातील श्री सोमेश्वर हायस्कूलचे विद्यार्थिनीं तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये व कोको स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकविल्यामुळे जिल्हास्तरावर निवड झाल्यामुळे या सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थिनींचे सत्कार श्री गणेश कला क्रिडा,सांस्कृतिक तरुण मंडळाच्या वतीने सद्गुरु श्री शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींच्या हस्ते वही,पेन,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सलग अकरा दिवस या मंडळाने अतिशय शांतपणे,अतिशय उत्साही वातावरणात प्रवचन व इतर कार्यक्रम राबविल्यामुळे सरपंच व सर्व सदस्य आणि गावातील सर्वच भक्ताकडून स्तरातून या मंडळाचे कौतुक होत आहे.
या मंडळाच्या वतीने पाच दिवस बेळंकीचे महाराज श्री गुरुशिवलिंग शिवाचार्य महास्वामीजीचे प्रवचन व महाप्रसाद ठेवून समाजाला एक प्रकारे बौद्धिक,अध्यात्मिक ज्ञान दिले.या मंडळांनी विविध कार्यक्रम घेऊन व साध्या पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढून गणेश उत्सव साजरा केला.