
सलगरे ग्रामस्थांच्या कडून पालक मंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा जंगी सत्कार, पालक मंत्र्यांच्या प्रयत्नाने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराला ब वर्ग दर्जा तसेच विविध रस्त्यासाठी 18 कोटी पेक्षा जास्त विकास निधी उपलब्ध, तानाजी पाटील यांची माहिती.
महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून तसेच माजी सरपंच तानाजी पाटील यांच्या पाठपुराव्याने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराला ब वर्ग तीर्थ क्षेत्र दर्जा प्राप्त झाल्याने सलगरे ग्रामस्थांनी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन जंगी सत्कार केला.
माजी सरपंच तानाजी पाटील यांच्यासह सलगरे गावातील प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी पेढा भरवून याचा आनंद साजरा केला. श्री सिध्देश्वर मंदिर ब वर्ग दर्जा तीर्थक्षेत्र सह पालकमंत्र्यांनी सलगरे गावातील वर्षानुवर्षे प्रलंबित विविध रस्त्याच्या विकास कामासाठी 18 कोटी पेक्षा जास्तचा निधी उपलब्ध करून दिला. सलगरे गावच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याने पुन्हा पुन्हा पालक मंत्री म्हणून सुरेश भाऊ खाडे हे लाभावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना तानाजी पाटील यांनी केली .
यावेळी सिध्देश्वर मंदिर पुजारी नाथाप्पा पुजारी, सर्जेराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य रमेश सळके,अरुण कांबळे, अजेटराव गुरुजी, सचिन निंबाळकर, मारुती गायपुरे, बुरलिंग हारगे, सचिन शिपुरे, गणपती गुंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सलगर येथील सिद्धेश्वर मंदिर तसेच कवठेमंकाळ तालुक्यातील नांगुळे ग्रामदैवत हजरत सात सय्यद पिर दर्ग्याला ही ब वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने नामदार गिरीश महाजन यांचे पालक मंत्र्यांनी आभार मानले.