
सांगली, ता.१४ : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करीत ९ अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित, ५१ जणांना सुधारणा नोटीस बजाविण्यात आल्या. सांगलीतर्फे मिठाई, खवा, फरसाण, चिवडा आदी विक्री करणाऱ्या आस्थापनांवर धडक तपासणी मोहीम राबविण्यात
अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयामार्फत जिल्ह्यामध्ये ११ ऑगस्ट २०२५ पासून ते (ता.१४) पर्यंत अन्न विक्री करणाऱ्या एकूण १७५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये दूध 38, खवा मावा 14, तूप 28, खाद्यतेल 36, मिठाई 58, ड्रायफ्रुटस 18, चॉकलेट 20, भगर 14 व इतर अन्नपदार्थ (रवा, बेसन, आटा इत्यादी) चे 43 नमुने असे एकूण 269 अन्न नमुने घेतले असून प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणीच्या अनुषंगाने 51 अन्न व्यावसायिकांना सुधारणा नोटीस पाठविण्यात आल्या असून 09 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच, 4 अन्न आस्थापनांच्या तपासण्या करुन 984 लिटरचा व 3 लाख 83 हजार 581 रुपये किंमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
ग्राहकांनीही सतर्क राहून कुठेही भेसळयुक्त किंवा कमी दर्जाचे अन्नपदार्थ विक्री होत असल्याचे आढळल्यास त्वरित प्रशासनाच्या १८०० २२२ ३६५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अन्न तथा पदनिर्देशित अधिकारी परिमंडळ-1 रा. अ. समुद्रे यांनी केले आहे.