मनपा क्षेत्रातील महत्वाचे ५ रस्ते लवकरच होणार विकसित

सांगली, ता.१७: मनपा क्षेत्रातील महत्वाचे ५ रस्ते लवकरच होणार विकसित.सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील विकास योजनेच्या नकाशातील काही प्रमुख DP रस्ते तसेच शासनाच्या नगरविकास विभागाकडील UDCPR, फ्रीज एरिया मधील तरतुदीनुसार असणारे खालील नमूद ५ रस्ते विकसित करण्याच्या अनुषंगाने दि. ११/०९/२०२५ रोजी सकाळी सत्रात सहा. संचालक नगररचना व शहर अभियंता समवेत मा आयुक्त यांनी स्थळ पाहणी करण्यात आली होती.

  • विजयनगर कोर्ट बिल्डिंग कुंभारमळा धामणी ग्रामपंचायत हद्दीतून रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा संलग्न रस्ता
  • विश्रामबाग MSEB रस्ता स्फूर्ति चौक सहयोग नगर पासून धामणी ग्रामपंचायत हद्दीतून रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा संलग्न रस्ता.
  • पंढरपूर स्मशान भूमीपासून रमा उद्यान पूर्व बाजू खाडे शाळेसमोरील रस्ता सांगलीकर मळा-दिडीवेस टाकळी रस्ता चौक वखारभाग म्हैशाळ उड्डाण पुलाकडे जाणारा १०० फुटी DP रस्ता
  • कृपामाई हनुमान मंदिर सिनर्जी हॉस्पिटल भारतनगर ईदगाह मैदान गेस्ट हाऊस ACS कॉलेज पर्यंतचा १०० फुटी DP रस्ता
  • जुना हरीपूर रोड

महापालिका विकास योजनेतील रस्ते विकसित करण्याच्या अनुषंगाने रस्त्यामध्ये येणारी जागा TDR द्वारे ताब्यात घेण्यात येणार —-मनपा आयुक्त सत्यम गांधी—

उपरोक्त रस्त्यांचा मनपा हद्दीतील बहुतांश भाग मनपाच्या ताब्यात आहे. तसेच, काही माग खाजगी मिळकत धारकांकडून ताब्यात घेणे आवश्यक आहे. यानुसार, सदर रस्त्यांमध्ये येणारी खाजगी मिळकतधारकांकडे असणारी जागा ही TDR देऊन ताब्यात घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्या कामी रस्त्यामधील काही भाग शासकीय रुग्णालय मिरज, गेस्ट हाऊस, सार्वजनिक बांधकाम विभाग इ. शासनाच्या विभागाकडून ताब्यात घेणे आवश्यक आहे. याअनुषंगाने आवश्यक कार्यवाही करुन व पत्रव्यवहार करुन सदर रस्त्यांची जागा लवकरात लवकर महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी नगररचना आणि शहर अभियंता यांना आयुक्त सत्यम गांधी यांनी आदेश देऊन कार्यवाहीचा अहवाल ७ दिवसात सादर करणे कामी सूचित केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button