
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद )–मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाबाबत बोलताना म्हणाले आता राजकारणात उतरलो नाही; पण आरक्षण मिळाले नाही तर विधानसभेला पूर्ण ताकदीने संपूर्ण मराठा समाज विधानसभेला मैदानात उतरेल. यावेळेस फक्त पाडा म्हणालो नाव घेतलं नाही. विधानसभेच्या वेळी नाव घ्यावे लागेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. तर धनंजय मुंडे जातिवाद करत नाही, असं वाटत होतं; मात्र मागील काही दिवसांपासून ते ज्या पोस्ट करायला लावत आहेत, त्यावरून ते पण जातिवाद करत आहेत असं दिसत आहे. मराठा बांधवांनी एक महिना शांत राहावे; पण इतके पण शांत राहू नका, असा इशारा त्यांनी दिलाय.