
लिंगनूर, ता.२५ : (ता.मिरज) येथील ऋतिका बाळासाहेब मगदूम या विद्यार्थिनींने जिल्हा परिषद शाळा, लिंगनूर येथील शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादक केले. ऋतिकाने यश संपादन केल्याने गावातून व शाळेतुन तिचे कौतुक होत असून तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या उच्च प्राथमिक परीक्षेत ऋतिका हिने ३०० पैकी २७६ गुण मिळवून बाजी मारत राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. ऋतिकाने जिद्द, चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर तिने नवोदय परीक्षेत ही यश मिळवले आहे.
ऋतिकाचा यशामध्ये शाळेच्या वर्गशिक्षिका सो. मुक्ताताई कुडचे, मुख्याध्यापक आरगे सर व सर्व शिक्षकांचे योगदान लाभले आहे. त्याचबरोबर आई-वडील आणि मित्र परिवाराचे वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळाले आहे.