निवडणुकीत ज्यांनी रंग दाखवला त्यानां बेरंग करू. आणि जसाच तसे उत्तर देऊ मा. संजयकाका पाटील

सांगली मतदारसंघात लोकसभेची रंगतदार तिरंगी लढत सांगलीकरांना अनुभवायला मिळाली. या दरम्यान उमेदवारांच्या आरोप प्रत्यारोपच्या झाडी पाहायला मिळाली. लोकसभा निवडणुकीत बंडखोरी ही पाहायला मिळाली यात उमेदवारीचा असेल किंवा कार्यकर्त्यांचा असेल. पण बंडखोरी उफाळून आलेली सर्वांना पाहायला मिळाली. अश्याच वातावरणात महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी आतून बंड करून पक्ष धमर्म ना पाळणाऱ्याना चांगलेच सुनावले आहे.लोकसभा निवडणुकीत रंग दाखविणाऱ्या नेत्यांचा व्याजासाहित हिशेब चुकता करणार, असा इशारा भाजप उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. गत तीन महिन्यापूर्वी भाजप कोअर समितीची बैठक झाली होती. त्या बैठकीत भाजपची केंद्रीय व राज्य निवड समिती सांगली मतदारसंघातून जो कोणी उमेदवार देईल, त्याच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही सांगली जिल्ह्यातील सर्वच भाजप नेत्यांनी दिली होती. मात्र कोअर समितीमधीलच काही प्रमुख नेत्यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत आपला खरा रंग दाखवला. मात्र भाजपसह महायुतीच्या काही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आत एक अन बाहेर एक असा प्रचार केला. या नेत्यांनी यापूर्वीच्या निवडणुकीत काय केलं अन आताच्या लोकसभा निवडणुकीत काय करीत होते, याची संपूर्ण कल्पना आली होती, असे संजयकाका म्हणाले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button