
दि १५/०५/२४-मुंबई घाटकोपर येथे वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावर एक होर्डिंग कोसळले होते. यामध्ये घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सांगली महापालिका सतर्क झाली आहे. मनपा क्षेत्रात जितक्या अनधिकृत होर्डिंग आहेत त्या हटविण्याचे आदेश मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिले आहे. पुढे आयुक्त गुप्ता म्हणाले, शहरातील ज्या अधिकृत होर्डिंग्ज आहेत त्या परत एकदा तपासून घ्यावे, जेणेकरून कोणतीही जीवितहानी होणार नाही. त्यासोबत ज्या अनधिकृत होर्डिंग्ज आहेत त्यावर याआधीही कारवाई सुरूच होती पण या कारवाईला आता गती देत अनधिकृत होर्डिंग्ज ताबडतोब काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.