मिरज : प्रतिनिधी

सांगली , ता.१८ : जिल्हा परिषदेच्या काम वाटपात गडबड. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा परिषदेचे ता.१०.२.२०२५ रोजी झालेले कामवाटप हे असविधानिक आहे. इच्छापत्र व चलन भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ता. ७.२.२०२५ रोजी अचानक एक काम सोडले तर बाकीचे सर्व कामे दुपारी साडेतीन वाजता नंतर पोर्टलला दिसण्यास सुरुवात झाली. त्या कामाचे चलन डाऊनलोड करून सही घेऊन बँकेत जाऊन पैसे भरण्यास फक्त एक तासाच्या अवधी देण्यात आला होता. त्यामुळे बरेच सुभे अभियंता चलन भरण्यापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असून शेवटच्या क्षणी काही कामे मॅनेज करण्यात आले आहेत. त्यामुळे सदर कामवाटप कामाची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे मिरज तालुका उपाध्यक्ष परशुराम बनसोडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन चौकशी मागणी केली आहे. येत्या आठ दिवसात या प्रकरणाचे सखोल चौकशी न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याच्या इशारा देण्यात आला आहे.
