सांगली : प्रतिनिधी

सांगली , ता.१५ : येथील स्टेशन चौकातील गणेश मार्केट येथील नवीन गाळे बांधकाम अंतिम टप्प्यात असून लवकरच पूर्ण होऊन खोकी धारकांना उपलब्ध होणार आहे.
सदर कामास मा शुभम गुप्ता आयुक्त यांनी गुरुवार (ता.१३) रोजी सदर ठिकाणी
भेट देऊन पाहणी केली, कामाचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी सूचना दिल्या आहेत.
यावेळी सहा आयुक्त सहदेव कावडे ,शाखा अभियंता ऋतुराज यादव,संबंधित मक्तेदार व स्वच्छता निरीक्षक उपस्थितीत होते.