
सांगली , ता.१५ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सांगली आगार साठी बीएस-6 ह्या अद्यावत आधुनिक सेवायुक्त अशा पाच बसेस सांगली आगारास दैनंदिन चालनासाठी उपलब्ध झाल्या असुन सांगली मध्यवर्ती बसस्थानक येथे बसेसचा लोकार्पण सोहळा आज शनिवार (ता.१५) रोजी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते पार पडला. सांगलीसाठी २०० बसेसची मागणी केली आहे.
- बस मधील अध्यावत सुविधा

४१ सीटच्या या बसमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत. जसे की रिव्हर्स कॅमेरा, ऑटोमॅटिक डोअर सिस्टिम, अग्निविरोधी, पुश बकेट सीट (आरामदायी सीट), प्रत्येक सीटला मोबाईल चार्जर आदी सुविधा यामध्ये देण्यात आल्या आहेत.

यावेळी माजी आमदार नितिनराजे शिंदे, भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे, माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब घेवारे, जितेंद्र शहा, सुनिताताई मोरे, सुब्राव तात्या मद्रासी, रवींद्र वादवणे, विजय साळुंखे, अविनाश मोहिते, गजानन नलवडे, स्नेहजा जगताप, संदीप ताटे, आंबेगिरी मॅडम, विभाग नियंत्रक सुनील भोकरे, यंत्र अभियंता (चा) रमेश कांबळे,उप यंत्र अभियंता प्रवीण कांबळे,आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, स्थानक प्रमुख महेश पाटील, सहा कार्यशाळा अधीक्षक सौरभ औंधकर, आगार लेखाकार आकांक्षा जाधव आदी चालक, वाहक, इतर कर्मचारी व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.