विट्यात तरुणाने केली पोलिसाला धक्काबुक्की

विटा : प्रतिनिधी

विटा, ता. ११ : येथे पेट्रोलींग करत असलेल्या पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याची घटना घडली. सदर घटना विटा येथील मायककानगरमधील रस्तावर घडली आहे. याबाबत अक्षय सुनील धुमाळ (वय २१, मायाक्कानगर, विटा) याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करून विटा पोलिसांनी अटक केलेले आहे. याबाबत पोलिस धोंडिबा बबन वागतकर (नेमणूक पोलिस उपाधीक्षक कार्यालय, विटा) यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली.

संशयित आरोपी

पोलिसांची अधिक माहिती अशी की, धोंडिबा वागतकर हे हायवे पेट्रोलिंग विभागात चालक म्हणून काम करत आहेत. ते काल रात्री पोलिस वाहनामधून (एमएच १०, एन २५४९) मधून गस्त घालत असताना मायाक्कानगर येथे गेले असता संशयित धुमाळ रस्त्यावर उभा राहून आरडाओरडा करीत होता. वागतकर त्यास ‘रस्त्यामधून बाजूला हो,’ असे त्याने ‘तुमचा काय संबंध नाही, तुम्ही मला काय सांगायचे नाही,’ असे म्हणून वाहनावर जोरजोरात हाताने मारण्यास सुरवात केली. त्यावेळी वागतकर त्यास समजावून सांगत असताना त्यांच्या अंगावर धावून गेला. त्यांची कॉलर धरून हाताने धक्काबुक्की करून अंगाशी झोंबाझोंबी केली. अन्य पोलिस कर्मचारी सुतार हे धुमाळ यास ‘आमच्या अंगाजवळ येऊ नको,’ असे सांगत असताना त्याने मोठमोठ्याने शिवीगाळ करून ‘मला. घेऊन गेला तर तुम्हाला ठेवणार नाही, अशी धमकी दिली. त्याने शासकीय कामात अडथळा आणला. याबाबत विटा पोलीसांत शासकीय कामात अडथळा अणल्याबाय गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास विटा पोलीस करीत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button