
सांगली , ता.८ : महिला दिनानिमित्त मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांच्यावतीने सर्व नारी शक्तीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. महिला दिनानिमित्त आज महापालिकेकडून महिला दिनानिमित महिला अधिकारी कर्मचारी यांची पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रते महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अति आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या नियंत्रण खाली उपआयुक्त विजया यादव यांच्या उपस्थितीत आणि सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांच्या उपस्थितीत ही पदयात्रा काढण्यात आली. कर्मवीर चौक येथून या पदयात्रेला सुरू झाली. यानंतर प्रमुख मार्गावरून ही पदयात्रा महापालिका मुख्यालयात समाप्त करण्यात आली.
महिला कर्मचारी यांच्या सहभागाने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.वृषाली अभ्यंकर, स्मिता वाघमोडे, डॉक्टर शितल धनवडे, ज्योती सरवदे आदींनी या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन केले.
या वेळी महिला कर्मचारी , अधिकारी
मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.