कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड , ता.५ : येथील प्रकाशनगरात मंगळवार (ता.४) रोजी दुपारी एकच्या दरम्यान नात्यातल्या मुलीच्या छेडछाड केल्याच्या कारणातून ३८ वर्षीय युवक राहुल आप्पासाहेब सूर्यवंशी याच्या डोक्यात दगड व लोखंडी पाईप घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी तात्काळ सौरभ संदीप सावंत (वय २२) आणि संदीप रावसाहेब सावंत (वय ५२ दोघे रा प्रकाशनगर, तिसरी गल्ली, कुपवाड) या संशयित दोघा बाप-लेकाला ताब्यात घेतले. कुपवाड पोलिसांत मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. याबाबत फिर्याद हवालदार फिर्याद संदीप सदाशिव पाटील यांनी दिली.
पोलिसांनी बुधवार (ता.५) दोघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शुक्रवार (ता. ७) पर्यत कोठडी सुनावली. अधिक तपास सहायक निरीक्षक दीपक भांडवकर करीत आहेत.