
दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर सर्वांचे लक्ष मुख्यंमत्री पदाचा दावेदार कोण होणार ? यांच्याकडे लागले होते. मुख्यमंत्रिपदाच्या यादीत प्रवेश वर्मा, विजेंद्र गुप्ता, सतीश उपाध्याय, पवन शर्मा, आशिष सूद, रेखा गुप्ता, शिखा राय, रवींद्र इंद्रराज सिंह आणि कैलाश गंगवाल यांच्या नावांची चर्चा सुरू होती. पण अखेर भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे