
कुपवाड , ता.१९ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त खारे मळा परिसरात चिमुकल्यांनी शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा केला. मोरया बालमित्र मंडळातील चिमुकल्यांनी संकल्पना राबविली. महाराजांची मूर्ती एका सजवलेल्या गाड्यात ठेऊन तेथील परिसरात मिरवणूक काढली. चिमूकल्याच्या मुखातून शिवगर्जना घुमत होती. मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशभूषेत काहींनी सहभाग नोंदविलेला होता.
मिरवणुकीत तन्मय जमदाडे, ओम जमदाडे, ओजस शिंदे, अराध्या शिंदे, श्रेयश कांबळे, अन्वय परीट, श्लोक कोथळे, विराज सिधनाळे, अमेय करंदीकर, दर्श कोळे, श्रीवल्ली पाटील, समर्थ पाटील यांनी सहभाग नोंदविला.