नर्सिंगच्या परीक्षेच्या तणावातून टोकाचे पाऊल घेत विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपवलं आपलं जीवन

कोल्हापूर ता.१२ : परीक्षेच्या तणावातून बीएसस्सी नर्सिंग शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. आत्महत्या केलेल्या महाविद्यालयीन तरुणीचे नाव अमृता संतोष आंबेकर (वय-१९, रा. इंदिरानगर, शिरोळ) असे आहे. सदर घटना मंगळवारी (दि.११) दुपारी अडीचच्या सुमारास उघडकीस आली.
अधीक माहिती अशी की, जयसिंगपूर येथील एका बीएसस्सी नर्सिंग कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाचे शिक्षण अमृता घेत होती. बुधवारपासून (ता.१२) परीक्षा सुरू होणार होती. या परीक्षेच्या तणावातून टोकाचे पाऊल घेत मंगळवारी (दि.११) दुपारी अडीचच्या सुमारास राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत अमृताला तिचा वडीलांनी खाली उतरून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले, अधिक तपास पोलीस करीत आहे.