पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

सांगली ता.६ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली व लठ्ठे पॉलिटेक्निक सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” सोमवार (ता.१७) फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता लठ्ठे पॉलिटेक्निक, एमआयडीसी, कुपवाड, सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे.

सदर मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

या मेळाव्यात 500 पेक्षा अधिक पदाकरिता जिल्ह्यातील नामांकित अशा 12 पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग असणार आहे. दहावी, बारावी, आय. टी. आय., डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट या प्रकारची शैक्षणिक पात्रता असणाऱ्या आणि सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी विविध पदांकरिता, विविध उद्योजकांकडे प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटद्वारे आपला ऑनलाईन सहभाग नोंदवावा. रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली या कार्यालयाशी 0233-2990383 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button