
सांगली ता.६ : जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी- करजगी येथील चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवार (ता.६) सकाळी १० च्या सुमारास घडली असून पांडुरंग सोमनिंग कळळी, वय ४५ वर्ष,रा. करजगी या संशयित आरोपीच्या मुसक्या उमदी पोलिसांनी आवळल्या. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण झाले असल्याने परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, चार वर्षीय बालिका आजी-आजोबा सोबत करजगी येथे राहत होती. तिचे आई वडील परगावी कामास होते. चार वर्षीय बलिकेच्या शेजारी संशयित पांडुरंग राहत होता. त्याचा दारात बदामाचे झाड आहे. गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास चार वर्षीय बालिका खेळत खेळत बदाम घेन्यासाठी संशयित आरोपी पांडुरंग कळळी याच्या घरासोमर आली. तिला खाण्याचे आमिष दाखवून पत्राचा शेडमध्ये नेले व कोण नसलेले पाहून चार वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला. खून केल्यानंतर मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटित लपवला.
६ फेब्रुवारी रोजी सकाळपासून मुलगी दिसत नसल्याने आजीने शोधाशोध सुरू केली. गावात ही शोधाशोध सुरू होती. त्या दरम्यान आजीला शेजारांनी सांगितले की नातीला शेजारीच राहणारा पांडुरंग कळळीने घेऊन गेल्याचे. आजीने पांडुरंगला नाती बद्दल विचारणा केली असता, त्याने काही माहीत नसल्याचे सांगितले. गावकऱ्यासोबत पांडुरंग ही बलिकेचा शोध घेऊ लागला. मुलगी मिळत नसल्याने पोलीस पाटील व नागरिकांनी उमदी पोलिसांत कळविले. ही माहिती समजताच घटनास्थळी उमदी पोलीस ठण्याचे सहा.पोलीस निरीक्षक संदीप कांबळे व त्यांचे पथकाने धाव घेतली. मुलगीस शोधण्यास तपास करत असताना असे कळाले मुलगी पांडुरंग सोबत पाहिल्याचे पांडुरंगच्या घराची झडती घेतली असता पेटीमध्ये पोते दिसले. पोत्यावर डाग असल्याने उघडून पाहिले असता मुलीचा मृतदेह दिसून आला. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता चार वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची पांडुरंगने कबुली दिली. ही घटना समजताच गावकारांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जत रुग्णालयात पाठवला आहे. अधिक तपास पोलीस करत असून कोणतेही अनुचित प्रकार होऊ नेय म्हणून पोलिसाचा मोठया प्रमाण्यात बंदोबस्त होता.