
शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरात होणार नसल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी माध्यमास दिली. ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची यावर सविस्तर चर्चा झाली आहे. हा शक्तीपीठ महामार्ग सांगलीपर्यंत होईल, पण कोल्हापुरात होणार नाही. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला राज्य सरकारने नुकताच हिरवा कंदील दाखवला. या प्रकल्पाला कोल्हापूर, सांगली येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता.
या प्रकल्पाची २०२३ मध्ये समृध्दी महामार्गाचा उद्घाटनावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. हा महामार्ग ८०२ किमी लांब नागपूर ते गोवा असा असणार आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडची माहूरची रेणुका देवी या तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडेल. हा महामार्ग सांगली, कोल्हापूरसह १२ जिल्ह्यांमधून जाणार आहे.
हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यानंतर आता मुख्यमंत्री शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावर काय निर्णय घेतील याकडे सर्वाचे लक्ष लागले.