मंत्री नितेश राणे यांनी केले फिश मार्केटच्या वास्तूचे भूमिपूजन

सांगली ता.१० : महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या फिश मार्केटच्या वास्तूचे भूमीपूजन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. फिश मार्केटमध्ये अद्ययावत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावे. हे फिश मार्केट सर्व सोयीसुविधांनीयुक्त होण्यावर प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी भर द्यावा, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज येथे केले. सांगली येथील खणभाग येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत फिश मार्केटच्या भूमिपूजनांतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे बोलताना म्हणाले की…

यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले, सांगली शहरात एक चांगली वास्तू उभारत आहे. यासाठी आवश्यकता भासल्यास खासदार फंडातूनही मदत करू. हा चांगला प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले. महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले, फिश मार्केट पूर्ण होईपर्यत येथील व्यावसायिकांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरात लवकर ही वास्तू उभारण्यासाठी प्रयत्न करू. या वास्तूमध्ये आणखी एक मजला व कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करू. स्वाती शिंदे यांनी ही वास्तू उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविकात अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या फिश मार्केटच्या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम 8 कोटी 7 लाख 53 हजार इतकी आहे. कामाचे क्षेत्रफळ 1520 चौरस मीटर आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button