कुपवाड | प्रतिनिधी

कुपवाड ता.२४ : सावळीत युवकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. अमित उमाजी बनसोडे (वय ३६ वर्षे, राहणार -संभाजी चौक, कापसे प्लॉट, कुपवाड, तालुका मिरज जिल्हा सांगली) असे गळफास लावून मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत कुपवाड पोलिसांत अमोल उमाजी बनसोडे (वय 37 वर्षे , व्यवसाय- रिक्षाचालक रा.संभाजी चौक कापसे प्लॉट, कुपवाड तालुका मिरज, जिल्हा सांगली) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांच्या अधिक माहितीनुसार कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावळी गावाच्या ओढ्याजवळ शेतातील लिंबाच्या झाडास आज दुपारी चारच्या पूर्वी दोरीने स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. माहिती समजताच घटनास्थळी कुपवाड पोलिसांनी धाव घेऊन आयुष हेल्पलाइन टीमच्या मदतीने मृतदेह खाली उतरून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. याबाबत कुपवाड पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला. आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहे.