
बारामती : अजित पवार यांचा बारामतीतून मोठया मताधिक्याने विजयी झाला. लोकसभेच्या निवडणुकीत सुमित्रा पवार यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता. या पराभवानंतर विधनसभा निवडणुकीला बारामती मतदारसंघारडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष्य लागलं होतं. सर्वांना वाटत होते की, अजित पवार व युगेंद्र पवार यांची चुरशीची लढत होणार, पण एकंदरीत हा निकाल पाहता या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. अजित पवारांना 196640 तर युगेंद्र पवारांना 80458 इतकी मते मिळाली आहेत. अजित पवार यांनी 1,16,182 मतांनी विजयी आहे. अजित पवारांना गेल्या विधानसभा निवडणुकीचा मताचा पॅटर्न साबुद ठेवला आहे.