कुपवाड : प्रतिनिधी

कृष्णा व्हॅली चेंबर आणि लघु उद्योग भारती सांगली यांच्या सयुंक्त विद्यमाने औद्योगिक वसाहतीमधील नवीन कामगारांना भविष्य निर्वाह निधी यांच्या कडून रोजगार संलग्न प्रोत्साहन योजना ही योजना सुरु होणार आहे याबाबतची माहिती देण्यासाठी कोल्हापूर भविष्य निर्वाह निधीचे आयुक्त अमित चौगुले हे आले होते. यावेळी बोलताना चौगुले म्हणाले की, जे नवीन कामगार भविष्य निर्वाह निधीचा लाभ घेणार आहेत त्यांच्यासाठी केंद्र शासन मालक व कामगार यांची भविष्य निर्वाह निधीची पहिली २ वर्षे यांची संपूर्ण रक्कम म्हणजे २४ टक्के तसेच ३ ऱ्या वर्षी १६ टक्के आणि ४ थ्या वर्षी ८ टक्के रक्कम हि केंद्र शासन भरणार आहे. तसेच जे नवीन कामगार भविष्य निर्वाह निधीचा लाभ घेणार आहेत त्यांना पहिल्या वर्षी टप्प्याटप्प्याने १५००० रुपये त्यांच्या खात्त्यात जमा करणार आहेत असे सांगितले आहे. सध्या या योजनेची माहिती देवून सूचना घेण्याचे काम चालू आहे. सदर सुचविलेल्या सूचनांचा विचार करून सदरची योजना हि अंदाजे पुढील वर्षी जानेवारी २०२५ पासून चालू होईल तरी सदर योजनेचा जास्तीत जास्त कामगारांनी लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
यावेळी लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष संतोष भावे यांनी स्वागत केले आभार लघू उद्योग भारतीचे सचिव अॅड गणेश पाटील यांनी आभार मानले. यावेळी भविष्य निर्वाह निधीचे प्रवर्तन अधिकारी प्रकाश नाईक, सुनिता सडोलीकर, संस्थेचे व्यवस्थापक अमोल पाटील, उद्योजक प्रतिनिधी पवन सगरे, राजेंद्र पाटील, संजय जाधव, दत्तात्रय लोकरे, अतुल जोशी रियाज कमिरकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.