
कुपवाड : भ्रष्टाचाराविरुद्ध संतप्तता धारण करत युवा जागृती मंचातर्फे कुपवाड महापालिका कार्यालयाच्यासमोर मंगळवारी (ता.8) नागरिकांनी आंदोलन केले. येणाऱ्या आठ दिवसांत त्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी न लागल्यास मनपाच्या मुख्यालयासमोर हंटर फोड आंदोलन करू. असा इशारा युवा जागृती मंचचे शुभम गिड्डे यांनी दिला.
गिड्डे म्हणाले , नगररचना विभागातील अधिकारी हे सर्वसामान्य नागरिकांची कामे सहजासहजी करीत नाहीत. अनेक नागरिकांचा त्याबाबत संताप व्यक्त होत आहे. अधिकाऱ्यांच्या संबंधितांची कामे मात्र झटपट होतात. अशा कार्यपद्धतीचा आम्ही निषेध करतो. त्यासाठी श्राद्धरूपी आंदोलन आज करत आहोत.
यावेळी युवराज शिंदे, सतीश वाघमारे संदीप कुंभार, आप्पासो शेंडगे, अमित पाटील, महेश पाटील, समीर भोसले, कुलदीप सावंत श्रीकांत जाधव यांच्यासोबत नागरिक उपस्थित होते.