
कुपवाड | बामणोली | प्रतिनिधी
बामणोली : सांगली विधानसभा मतदार संघाचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी बामणोली गावाला ५ कोटी २३ लाखांचा निधी दिला आहे. दिलेल्या निधीच्या विकासकामांचे उदघाट्न आणि लोकार्पण सोहळा आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.
बामणोली गावाला जवळपास साडे पाच कोटींचा भरघोस असा निधी आमदार सुधीर दादांनी दिला असल्याने आमदार सुधीर दादा गाडगीळ यांचे बामणोली ग्रामपंचायत व नागरिक यांच्याकडून हलगी व फट्याकांच्या अतिषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले.
ग्रामविकास निधी, आमदार फंड, प्रादेशिक पर्यटन विकास, निधी, जनसुविधा, ग्रामपंचायत वित्त आयोग निधी, खनिकर्म निधी विकासकामे केले. बामणोली गावास इथून पुढच्या काळात निधी देऊ असे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी सांगितले.
या योजनेतून निधी मंजूर
यावेळी ,भाजप नेते मा सुभाषबचिंचकर, सरपंच गीता चिंचकर, उपसरपंच विष्णू लवटे, ग्रामपंचायत सदस्य राजेश संनोळी,किरण भोसले, संतोष सरगर, दिग्विजय चिंचकर, भीमराव रुपनर, अर्चना पाटील, संगीता पाटील, प्रियांका बामणे, मालन गायकवाड, अनिता जाधव, स्नेहल वनसुरे, रुपाली यमगर, स्वरूपा वारणकर, तंटामुक्ती अध्यक्ष चेतन आवटी, पाणी पुरवठा उपाध्यक्ष संजय मोटे सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.