
कुपवाड मध्ये बहुचर्चित असलेले ट्रीमिक्स रस्त्याबाबत व्यापार संघटना व संघर्ष समिती यांनी कुपवाड ट्रीमिक्स रस्ताचे काम बंद पाडले. ट्रीमिक्स रस्ता व्हावा यासाठी धडपडणारीच रस्ताचे काम बंद पाडतात अशा अनेक चर्चेना कुपवाडातून उधाण आले होते. आज सोमवार (ता.७) रोजी कुपवाडमध्ये याबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत व्यापार संघटना, संघर्ष समिती व कुपवाड मधील नागरिक आणि कुपवाड मधील नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी माजी व्यापार संघटना अध्यक्ष अनिल कवठेकर बोलताना म्हणाले की, आम्ही या रस्ताचे काम मुधाम बंद पाडले नाही. या रस्ताच्या कामासाठी बऱ्याच खस्ते खाल्ले आहेत. वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. हा रस्ता करताना ज्या समस्या उदभवला त्या समस्यांचे निराकरण होऊन रस्ताचे काम व्हावे अशी आमची रास्त मागणी आहे. हा रस्ता व्हावा यासाठी आम्ही वेळोवेळी आयुक्त , उपायुक्त व संबधीत अधिकारी यांच्याशी भेटून संवाद साधला व रस्ताची मूळ परिस्थिती समक्ष दाखवलेली आहे. या रस्तासाठी आंदोलने ही केलेली आहेत. हा रस्ता मुधाम बंद पाडणे हा आमचा हेतू नसून तो समस्या विरहित व्हावा यात आमचा एवढाच उद्वेष आहे. जे काम होत आहे ते मोजमाप व नकाशाप्रमाणे व्हावे आणि जे अनाधिकृत अतिक्रमण आहे ते हाटवुन येत्या दिवाळी अगोदर रस्ताचे काम करावे. असे या बैठकीत एकमताने ठरलेले आहे. उद्यापासून या रस्ताच्या कामाला चालना मिळेल व दिवाळी पर्यंत रस्ताचे काम पूर्ण होईल अशी आशा ही बाळगली आहे. या बैठकी नंतर कुपवाड मधून उलट-सुलट उधाण आलेल्या चर्चला अखेरकार फुल्ल स्टॉप मिळाला.